लखनऊमध्ये ‘अल कायदा’चे दोन दहशतवादी पकडले

 

 

 

लखनऊ : वृत्तसंस्था ।  दहशतवादी दडून बसल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकास (एटीएस) मिळाली होती. काकोरी पोलीस ठाणे परिसरातील घराला एटीएसने कारवाई करत दोन दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या.

 

हे दोन्ही दहशतवादी अल कायदा संघटनेचे असल्याची माहिती समोर आली असून, दोघेही पाकिस्तानी हस्तक आहेत. याचबरोबर एटीएसच्या हाती मोठ्याप्रमाणावर स्फोटके देखील लागल्याने,  घातपातचा मोठा कट उधळला गेल्याचे सांगितले जात आहे.

 

 

एटीएस कडून अद्यापही परिसरात शोधमोहीम सुरू आहे. एटीएस सोबत स्थानिक पोलीस देखील या शोध मोहीमेत सहभागी झालेले आहेत. परिसरातील बरचशी घरं देखील रिकामी करण्यात आली असून, बॉम्ब शोधक व नाशक पथकास देखील पाचारण करण्यात आले आहे. तर, अटक करण्यात आलेल्या दोन्ही दहशतवाद्यांची कसून चौकशी सुरू आहे. सकाळी १० वाजेपासून ही विशेष मोहीम एटीएसने सुरू केलेली आहे, जी अद्यापही सुरू आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!