रोहिणखेड येथील उधारीवरून वयोवृध्दाचा खून; चार संशयित अटेत

शेअर करा !

बुलढाणा प्रतिनिधी । तालुक्यातील रोहीणखेडा येथील वयोवध्दाने उसनवारीने ३०० रूपये घेतल्याच्या वादातून चौघांनी बेदम माहरण करून डोक्यात लाकडी फळी मारल्याने वृध्द ठार झाल्याची घटना प्रजासत्ताक दिनी सकाळी घडली. याप्रकरणी चौघांना ताब्यात घेतले असून पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तालुक्यातील रोहीणखेड येथिल मृतक शेख कदीर शेख रज्जाब यास घटनेतिल आरोपी शेख फारुख शेख मुसा याला उधारीचे ३०० रूपये देण्याचे कारणावरुन व झालेल्या जुन्या वादा बाबत धामणगाव बढे पोलीसात रिपोर्ट देण्यास जात असल्याची माहीती मिळाली असता संशयित आरोपी आरोपी शे.फारुख शे.मुसा, शाहरुख शे.फारुख, जीया शे.फारुख, रियाज शे.फारुख यांनी घटनेतील फीर्यादी मृतकाचा मुलगा शे.साबीर शे.कदीर याची काॕलर पकडुन लोटपोट केली व साक्षिदार याने फीर्यादी शे.साबीर यास बाजुस नेले असता आरोपी यांनी मृतक शे.कदीर शे.रज्जाब यास शिवीगाळ करुन लोटपाट करित तुम हमारे खिलाफ  पो.स्टे मे रिपोर्ट देने जायेंगे आज तुमको जान से मार देते है असे म्हणुन मृतकाचे डोक्यात लाकडी काठीने मारुन जखमी केले व जिवानी ठार मारले. मयताच्या मुलाच्या फिर्यादीवरून फारुख शे.मुसा , शाहरुख शे.फारुख, जिया शे.फारुख,रियाज शे.फारुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास  जिल्हा पोलिस अधीक्षक  उपअधीक्षक यांचे मार्गदर्शनात ठाणेदार चंद्रकांत ममताबादे करीत आहे

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!