रेल्वे स्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

जळगाव प्रतिनिधी । जळगाव रेल्वे स्थानकावर एकाचा ३५ ते ४० वर्षीय अनोळखी तरूणाचा मृतदेह आज सकाळी आढळून आला आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे.

याबाबत माहिती अशी की, जळगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅट फार्म क्रमांक ५ वर एका ३५ ते ४० वर्षीय अनोळखी तरूणाचा मृतदेह आज ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास आढळून आला. दरम्यान या घटनेची माहिती जळगाव रेल्वे पोलीसांना देण्यात आली. पोलीसांनी पंचनामा केला असता अनोळखी असल्याचे सांगण्यात आले. खासगी वाहनाने मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आला आहे. तरूणाची दिर्घ आजाराने मृत्यू झाला असावा असा अंदाज वैद्यकीय अधिकारी यांनी व्यक्त केला आहे. याबाबत ओळख पटविण्याचे आवाहन रेल्वे पोलीसांनी केले आहे. अंगावर निळ्या फिक्कट रंगाची जिन्‍स पॅन्ट, दाढी मिशी वाढलेली असे मयत तरूणाचे वर्णन आहे. ओळख पटल्यास जळगाव रेल्वे पोलीसांशी संपर्क करावे असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक अनिंद्र नगराळे यांनी केले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!