रेल्वेच्या धक्क्याने तरूणाचा मृत्यू; धरणगाव पोलीसात नोंद

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील चावलखेडा येथे रेल्वे रूळावर ३६ वर्षीय तरूणाचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना आज घडली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, धरणगाव ते चावलखेडा स्टेशन दरम्यान ११ ऑक्टोबररोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास एका ३६ वर्षीय व्यक्तीचा रेल्वेव्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीला आली. याबाबत चावलखेडा स्टेशन मास्टर यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात याची माहिती कळविली. माहिती मिळताच धरणगाव पोलीस ठाण्याचे पोउनि गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ संतोष थोरात हे घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान मयताच्या खिश्यात मतदान कार्ड सापडल्याने सुभाषभाई दुराभाई गऊड (वय-३६) रा. पटेल नगर उधना, गुजरात असे असल्याचे समजले. याची चौकशी केली परंतू नातेवाईकांचा शोध लागला नाही. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास खुशाल पाटील करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!