रियाने सुशांतच्या बँक खात्यातून ३ कोटी खर्च केल्याचे पोलीस तपासात उघड

शेअर करा !

मुंबई (वृत्तसंस्था) रियाने सुशांतच्या बँक खात्यातून १५ कोटी रुपये ट्रान्सफर केल्याचा आरोप सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी केला आहे. परंतू पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासातून सुशांतने रिया आणि तिच्या भावावर ३ कोटी रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे.

store advt

 

 

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस, बिहार पोलीस आणि ईडी या तीनही तपास यंत्रणा पुराव्यांचा शोध घेत आहेत. सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप केले आहेत. बँक डिटेल्सनुसार रियाने फक्त स्वत: साठीच नाही, तर आपल्या भावासाठीही सुशांतचे पैसे खर्च केल्याचे समोर आले आहे. सुशांतच्या एका बँक डिटेल्सनुसार रियाने भाऊ शोविकच्या खात्यात विमानाच्या तिकिटासाठी, शोविकच्या हॉटेलच्या खर्चासाठी तसेच मेकअप खरेदीसाठी असे पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासातून सुशांतने रिया आणि तिच्या भावावर ३ कोटी रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!