रियाच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ

चार अभिनेत्रींसह १८ जणांची चौकशी

मुंबई: वृत्तसंस्था ।  अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू गुन्ह्यात अमली पदार्थांचा संबंध समोर आल्यापासून एनसीबीकडून तपास सुरू आहे. चार अभिनेत्रींसह १८ जणांची चौकशी करण्यात आली आहे. रियाच्या न्यायालयीन कोठडीत विशेष एनडीपीएस न्यायालयानं आणखी १४ दिवसांची वाढ केली आहे

, रिया चक्रवर्ती . शौविक चक्रवर्ती यांच्यासह काही दलाल अटकेत आहेत. रिया चक्रवर्तीच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेत ,कारण
. रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती तसंच आरोपी सॅम्युएल मिरांडा, दिपेश सावंत, झैल विलात्रा, अब्देल बसित परिहार, ड्वेन फर्नांडिस यांच्या न्यायालयीन कोठडीतही २० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

रियानं सुशांतच्या बहिणींवरही गंभीर आरोप करत एफआयआर दाखल केला होता. या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार दिला असून सुशांतला त्याच्या बहिणींनी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनविना औषधे दिली, असा आरोप करत अभिनेत्री रिया चक्रवर्तीनं त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. तो रद्द करण्याची विनंती करणारी फौजदारी रिट याचिका दोघींनी केली आहे.

याविषयी सध्या पोलिसांचा तपास सुरू असल्याने आम्ही हस्तक्षेप करू इच्छित नाही. त्यामुळे या टप्प्यावर तातडीने सुनावणी घेण्याचे कारण दिसत नाही’, असं नमूद करून तातडीच्या सुनावणीस उच्च न्यायालयाने नकार दिला. रिया चक्रवर्तीच्या वकिलांसह एफआयआरविषयी तपास करत असलेल्या सीबीआयला एक आठवड्यात उत्तर दाखल करण्यासाठी मुदत देऊन हायकोर्टानं सुनावणी पुढील मंगळवारी ठेवली.

अमली पदार्थांबाबत कुठलाही अभिनेता नारकोटिक्स कन्ट्रोल ब्युरोच्या रडारवर नाही. यामुळंच अटकेतील आरोपींच्या रिमांड अर्जात देखील कुठल्याही अभिनेत्याचं नाव नाही. त्यावरून आरोपीचा छळ करण्यात आलेला नाही हे सिद्ध होतं, असं एनसीबीनं स्पष्ट केलं आहे.

दलालांवरील कारवाई पथकाचे प्रमुख समीर वानखेडे यांनी सांगितलं की, ‘मुळात क्षितिज प्रसाद हा तपास व चौकशीत सहकार्यच करीत नाही. हेच आम्ही न्यायालयाला दिलेल्या रिमांड अर्जात स्पष्ट केले आहे. त्याने न्यायालयात केलेले आरोप चुकीचे असल्यानेच न्यायालयाने पुन्हा कोठडी दिली आहे. अभिनेत्यांचं नाव जबाबात घालण्यासाठी कुठलाही दबाव नाही. न्यायालयात रिमांड अर्जात अभिनेत्यांच्या नावाचा साधा उल्लेखही नाही. याचआधारे न्यायालयानं क्षितिजला पुन्हा कोठडी सुनावली आहे.’

मूळ तपास करणाऱ्या सीबीआयनं अद्यापही तपास सुरू असल्याचे म्हटले आहे. एम्सच्या अहवालात आत्महत्येचीच शक्यता मांडण्यात आली असली तरी सीबीआयने अजूनही तपास थांबवलेला नाही. विविध पैलूंचा अभ्यास सुरू आहे, असे सीबीआयने स्पष्ट केलं आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.