रा.काँ. अनुसूचित जाती विभगाच्या शहराध्यक्षपदी हर्षल मेढे

सावदा प्रतिनिधी । राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या अनुसूचित जाती विभाग काँग्रेसच्या शहरातध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते हर्षल मेढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सामाजिक कार्या मध्ये तन-मन-धनाने केलेली सेवा या सर्व कार्याची दखल घेत प्रदेश समन्वयक भगवान मेढे, रा.कॉ. शहराध्यक्ष माजी नगरसेवक रविंद्र बेंडाळे यांनी पक्षाच्या हिताच्या दृष्टिकोनातून हर्षल मेढे यांची अनुसूचित जाती विभाग काँग्रेस शहराध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. सदर नियुक्तीबद्दल हर्षल मेढे यांचे रावेर तालुक्यामध्ये सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच सावदा शहराचे सरचिटणीसपदी जयराज पुर्भि यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून भुसावळ काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष महेंद्र महाले, अल्पसंख्यांक विभागाचे जळगाव जिल्हा सरचिटणीस आमिरखाँ चाँद खाँ, रावेर तालुकाध्यक्ष शेख शकील शे. रउफ, शेख मोईन शेख हुसेन, रुपेश कुंभार, नबाब तडवी, विनोद भालेराव, कुसुंबा येथील चांगो भालेराव, जुम्मा हैदर तडवी, शेख असलम शेख घना, परवेज खान यासह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी सावदा शहराध्यक्ष हर्षल मेढे यांचा सत्कार भगवान जी मेढे यांच्याहस्ते करण्यात आला.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.