राहुल गांधी खासदारांसह हाथरसला रवाना

कारचे सारथ्य प्रियांका गांधींकडे

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हाथरसच्या पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी काँग्रेसच्या खासदारांसह दिल्लीतून हाथरसला रवाना झाले आहेत. प्रियांका गांधी वाड्रा या राहुल गांधी यांची कार चालवत आहेत, पीडित कुटुंबाची भेट घेण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही, असे राहुल यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी हाथरसच्या दिशेने निघाल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसही सक्रिय झाले आहेत. देशातील राजकीय वातावरण तापले आहे. लखनऊ ते दिल्ली आणि देशातील विविध शहरांमध्ये विरोध प्रदर्शन होत आहे. काँग्रेस पक्ष सतत योगी सरकारवर टीकास्त्र सोडत आहे. राहुल गांधी लवाजम्यासह निघालेले आहेत. डीएमडीवर वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली आहे.

काँग्रेसचे खासदार बसमधून प्रवास करत आहेत. नोएडा सीमेवर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. डीएनडीवर मोठ्या संख्येने पोलिस तैनात करण्यात आले आहेत.लखनऊमध्ये उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजयकुमार लल्लू यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. लखनऊतील बहुखंडी येथील लल्लू यांच्या निवासस्थानावर देखील मोठ्या संख्येने पोलिस तैनात आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.