रासेयोच्या हिवाळी शिबीरात डॉ. ग्रिष्मा पाटील यांचे मार्गदर्शन

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी।  शहरातील शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालय आणि ग्रामपंचायत खडकदेवळा यांच्या संयुक्त विद्यमानाने खडकदेवळा खु” ता पाचोरा येथे राष्ट्रीय सेवा योजना (एन. एस. एस.) चे विशेष हिवाळी शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे.

 

 

१७ जानेवारी ते २३ जानेवारी या कालावधीत हे शिबिर घेण्यात येत आहे. आज २२ जानेवारी रोजी पाचोरा येथील सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या संचालिका व बालरोग तज्ञ डॉ. ग्रिष्मा स्वप्निल पाटील यांनी शिबिरात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. “स्त्री आरोग्य व शिक्षण” या विषयांतर्गत त्यांनी महाविद्यालयीन मुलींना मार्गदर्शन केले. २१ व्या शतकात वावरतांना शिक्षणा सोबतच आरोग्याची कशी काळजी घ्यावी याबाबत त्यांनी उपयुक्त अशी माहिती दिली. एन. एस. एस. शिबिरात येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राध्यापक आर. बी. वळवी यांनी डॉ. ग्रिष्मा स्वप्निल पाटील यांचे आभार मानले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content