राष्ट्रीय महामार्गावर भिषण अपघात; दोन जण जागीच ठार!

चाळीसगाव, प्रतिनिधी | राष्ट्रीय महामार्गावरील चाळीसगाव – कन्नड रोडवरील एका हॉटेलजवळ झालेल्या भिषण अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची घटना आज उघडकीला आली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २१२- वरील चाळीसगाव – कन्नड रोडवरील सदिच्छा हॉटेल जवळ झालेल्या भिषण अपघातात हर्षल संतोष ठाकरे (वय-२८ रा. सांगवी ता. चाळीसगाव) व बोंबेदर कुमार उर्फ बॉबी खिलालाल सहा (वय-२२ रा. धनसनि भांदलगाव, राज्य उत्तराखंड) या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवार, २१ नोव्हेंबर रोजी ७:४५ वाजताच्या पूर्वी उघडकीला आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. व पंचणामे केले. दरम्यान मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हर्षल संतोष ठाकरे हा हॉटेलवर कामे करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. परंतु या घटनेने त्यांच्या घरावर डोंगर कोसळले आहेत. दरम्यान वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!