राष्ट्रीय महामार्गावर अपघात : वाहतुकीची कोंडी !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गवर मिनी ट्रक आणि पीकअप वाहनाचा आज सायंकाळी अपघात झाल्याने महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली.

 

या संदर्भातील माहिती अशी की, शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर वाटिका आश्रमच्या जवळ आज सायंकाळी सहाच्या सुमारास एमएच १५ एचएच २६७५ या क्रमांकाच्या पीकअप वाहनाला आयशर मिनी ट्रकने टक्कर दिली. यात सुदैवाने जीवात हानी झाली नसली तरी दोन जण जखमी झाले आहेत. या पीकअप वाहनावर डेअरी पॉवर असे लिहलेले होते.

 

दरम्यान, अपघात झाल्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली. दोन्ही बाजूंनी दूरपर्यंत वाहनांची रांग दिसून आली. पोलिसांनी अपघात स्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहनाला बाजूला केल्यानंतर वाहतूक मार्गी लागली. या संदर्भात पोलिसांनी नोंद करण्याचे काम सुरू केले होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.