राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या जिल्हा संघटक पदी नितीन नाईक तर मीडिया प्रमुख पदी अनिल तंवर

जामनेर, प्रतिनिधी | राष्ट्रीय बंजारा परिषद संघटनेच्या जळगाव जिल्हा संघटक पदी नितीन नाईक तर मीडिया प्रमुख म्हणून अनिल तंवर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष किसन राठोड यांच्या हस्ते मुंबई येथे देण्यात आले.

राष्ट्रीय बंजारा परिषद चे संस्थापक अध्यक्ष किसन राठोड यांच्या माध्यमातून बंजारा समाजासह विविध समाजातील लोकांसाठी सामाजिक उपक्रम राबवून समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय बंजारा परिषद संघटना काम करीत आहे. किसन राठोड हे नेहमी समाजाच्या विविध अडीअडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घेत असून त्यांचे मदत कार्य चालू असते. राष्‍ट्रीय बंजारा परिषदेचे संपूर्ण देशात विस्तार व्हावा या उद्देशाने विविध राज्यात व जिल्ह्यात संघटनेच्या नियुक्त्या केल्या जात आहे. त्याअनुषंगाने हि निवड करण्यात आली आहे. संघटना वाढीसाठी आपण काम करणार असल्याची माहिती प्रतिनिधीशी बोलताना नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे.

यावेळी बंजारा नायकन अलक्रित राठोड, मराठवाडा सचिव पी. डी. राठोड, शांतीलाल राठोड, करतार राठोड आदी संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!