यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने राष्ट्रीय डेंगु दिनानिमित्ताने नागरीकांच्या आरोग्याशी निगडित विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

किनगाव तालुका यावल येथील प्राथमिक आरोग्य केन्द्राद्वारे राष्ट्रीय डेंगु दिनानिमित्त किनगावच्या आरोग्य केन्द्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.मनिषा महाजन, द्वितीय वैद्यकीय अधिकारी तरन्नुम शेख व तालुका पर्यवेक्षक विजय नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव अंतर्गत उपकेंद्र आडगाव व डांभुर्णी येथे राष्ट्रीय डेंगु दिनानिमीत्त मोहीम राबवण्यात आली.

या मोहिमेअंतर्गत गावात डेंगुताप रुग्ण सर्वेक्षण,कंटेनर सर्वेक्षण,हस्त पत्रिका वाटणे इत्यादी बाबी करण्यात आल्या. तसेच यामध्ये गाव पातळीवर डेंगुतापाची लक्षणे उपचार डेंगुताप प्रतिरोधक उपाय योजना बद्दल जनजागृती व्हावी यादृष्टीकोणातुन माहिती नागरिकांना देण्यात आली नागरिकांनी आपापल्या घरातील पाणीसाठे झाकून ठेवणे, घरासमोरील नाल्या वाहत्या करणे खिडक्यांना जाड्या बसवणे,शौचालयाच्या व्हेंट पाईपला जाडी बसवणे घरासमोर पाणी साचू न देणे,आठवड्यातुन एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाडणे अशा सूचना आरोग्य कर्मचारी यांच्या वतीने यावेळी नागरिकांना देण्यात आल्या.
किनगाव प्राथमिक आरोग्य केंन्द्रा अंतर्गत येणाऱ्या मालोद, नायगाव, चिंचोली,डांभुर्णी उपकेंद्रासह किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डेंगुताप जनजागृती मोहीम राबविण्यात आली यात समुदाय आरोग्य अधिकारी डाँ.अशफाक ,डाँ.सोनल चौधरी, आरोग्य सेवक जिवन सोनवणे,पवन काळे(पाटील), आरोग्य सहाय्यीका श्रीमती उषा पाटील,आरोग्य सेविका शिला जमरा, गट प्रवर्तक प्रतिभा सोनवणे व आशा वर्कर यांनी मोहीम यशस्वी करण्यासाठी सहभाग घेतला होता.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.