राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत १० लाभार्थ्यांना धनादेश वाटप

भडगाव प्रतिनिधी । राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत तालुक्यातील १० महीला लाभार्थ्यांना आ. किशोर यांच्याहस्ते प्रत्येकी २० हजार अनुदानाचा धनादेश वाटप करण्यात आला.

या कार्यक्रमात लाभार्थ्याना संजय गांधी योजनेचा ही लाभ देण्यात येणार असल्याचे तहसिलदार सागर ढवळे यांनी सांगीतले. यावेळी तहसिलदार सागर ढवळे, संजय गांधी अनुदान योजनेचे नायब तहसीलदार एम. डी. मोतेराय, लिपीक ए. एन. सुहागीर, शिवसेना सहकार सेल चे युवराज पाटील, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, युवासेनेचे शहरप्रमुख निलेश पाटील आदि उपस्थित होते. राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत आशाबाई पाटील (यशवंतनगर), राधाबाई महाजन ( कोळगाव), सुनंदा पाटील ( भडगाव), बेबाबाई चव्हाण (वडगाव-नालबंदि), अंजनाबाई अंभोरे ( गोंडगाव), स्वाती पाटील ( भडगाव), देवकाबाई सिरसे (भडगाव), संगीता अंभोरे( गोंडगाव), जिजाबाई पाटील ( शिंदि), रेखाबाई पाटील ( मांडकी) यांना आमदार कीशोर पाटील यांच्या हस्ते अनुदानाचा धानदेश वाटप करण्यात आले. विषेश म्हणजे धनादेशाबरोबर एक मास्क व सॅनिटायझर देण्यात आले. सुत्रसंचालन नायब तहसीलदार एम.डी.मोतेराय यांनी केले.

 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.