राष्ट्रीय कन्या विद्यालयात पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने अ. भा.मराठा महासंघाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. बी.बी भोसले, युवक जिल्हाध्यक्ष ललित पाटील, युवक जिल्हा संपर्कप्रमुख कमलेश पाटील, चाळीसगाव शहराध्यक्ष खुशाल बिडे, तालुका अध्यक्ष ग्रामीण रमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील विद्यार्थिनींना अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

याबाबत सविस्तर वृत्त आले की, राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने राष्ट्रीय कन्या विद्यालयात सकाळी 9 वाजता राष्ट्रीय कन्या विद्यालयातील डॉ.प्रा. साधना निकम व सर्व शिक्षक वृंद यांनी तसेच मराठा महासंघाच्या चाळीसगाव शहर व तालुक्यातील पदाधिकारी व सदस्यांनी राजमाता जिजाऊ यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. १२ जानेवारी च्या राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने राष्ट्रीय कन्या विद्यालयात वकृत्व स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, निबंध स्पर्धा इत्यादी स्पर्धेचे आयोजन डॉ.प्रा. साधना निकम मॅडम यांच्या परवानगीने अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनेआयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेचा निकाल राजमाता जिजाऊ जयंती चे दिवशी डॉ. प्रा. साधना निकम मॅडम यांनी जाहीर केला. वकृत्व स्पर्धेत प्रथम कु. रिया धनंजय पाटील इयत्ता 8 वी, द्वितीय कु. मयुरी पंकज शेलार इयत्ता 9वी, तृतीय कु. वैभवी दशरथ गायकवाड इयत्ता 8वीयांना स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच गीत गायन स्पर्धेत प्रथम कु. वृषाली गोरख अहिरे इयत्ता 9वी, द्वितीय कु. श्वेता कल्याण दाभाडे इयत्ता 9वी, तृतीय वैष्णवी प्रकाश जावरे इयत्ता 12वी, तृतीय कु. सोनल गोविंदा पाटील इयत्ता 12वी, यांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच एकांकिका स्पर्धेत प्रथम कु. विजेता विजय मोरे इयत्ता 12वी, द्वितीय कु. सेजल समीर धर्माधिकारी इयत्ता 6वी, यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने निबंध स्पर्धा प्रथम कु. भूमिका विजय गवळी इयत्ता 9वी, द्वितीय कु. रिया धनंजय पाटील इयत्ता 8वी, तृतीय कु. ऋतुजा खुशाल बिडे इयत्ता12, तृतीय कु. सादिया अमजद खान इयत्ता 8वी यांना स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. निबंध स्पर्धा मोठ्या गटातून प्रथम हर्षदा एकनाथ बेलदर इयत्ता 12वी, द्वितीय दिपाली संजय मांडगे इयत्ता 12, तृतीय पुनम गणेश कुमावत इयत्ता11, उत्तेजनार्थ दीक्षा अशोक पटाईत इयत्ता11वी या विद्यार्थिनींना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

वक्तृत्व, गीत गायन, एकांकिका, निबंध स्पर्धा इत्यादी स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या 53विद्यार्थिनींना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच डॉ.प्रा. साधना निकम मॅडम यांनी आज पावतो केलेल्या सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल त्यांना मराठा महासंघाच्या वतीने स्मृतीचिन्ह सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या पारितोषिक वितरण सोहळा कार्यक्रमास राष्ट्रीय कन्या विद्यालयाचे डॉ. प्रा. साधना निकम मॅडम तसेच शिक्षक वृंद यांचे सहकार्य लाभले.

अखिल भारतीय मराठा महासंघाचे चाळीसगाव शहराध्यक्ष खुशाल बिडे यांनी त्यांचे आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास खुशाल बिडे चाळीसगाव शहराध्यक्ष, रमेश पाटील तालुका अध्यक्ष ग्रामीण, चाळीसगाव शहर सल्लागार नामदेव तुपे, शहर उपाध्यक्ष संजय पाटील, शहर सचिव रामचंद्र सूर्यवंशी, शहर कार्याध्यक्ष सिद्धांत पाटील, तालुका संघटक भाऊसाहेब पाटील, शहर संघटक मोतीराम मांडोळे, मराठा महासंघाचे सदस्य उमेश भाऊ पवार, मुकेश पाटील, माळशेवगा येथील भावी सरपंच विलास पाटील आधी मराठा महासंघाचे सदस्य , राष्ट्रीय कन्या शाळेतील प्राचार्य साधना निकम, उप प्राचार्य वाय .आर सोनवणे, सांस्कृतिक विभाग प्रमुख अनिता पाटील मॅडम, वंदना निकम मॅडम, अंजली पाटील मॅडम, रिता देशमुख मॅडम, स्वाती पाटील मॅडम सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content