जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियनच्या जिल्हाध्यक्षपदी हेमंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कामगार नेते उन्मेश पाटील यांनी नियुक्तीपत्र नुकतेच दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माथाडी व जनरल कामगार युनियचे जळगाव जिल्हाध्यक्षपदी अयोध्यानगरातील रहिवाशी हेमंत अशोक पाटील यांची नियुक्ती केली आहे. लोकाभिमुख सामाजिक कार्याची सर्व समावेशक राष्ट्रवादी विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांची ही नियुक्ती केली आहे. राष्ट्रवादी मजदूर काँग्रेस मजबूत करण्यासह पक्ष संघटनेसाठी ही निवड करण्यात आली आहे. पुढील कार्याच्या वाटचालीच्या उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख मुकेश शेवाळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.