राष्ट्रवादी पूरग्रस्त १६ हजार कुटुंबांना जीवनाश्यक वस्तू पुरवणार

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । १६ हजार कुटुंबांना पुराचा फटका बसला आहे  त्यांना राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून  जीवनाश्यक वस्तूंचं वाटप केलं जाणार असल्याची माहिती शरद पवारांनी दिली . मुंबईत पत्रपरिषदेत ते बोलत होते.

 

 

राज्याला पावसाचा फटका बसला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आढावा घेतला आहे. महाराष्ट्राला अशा संकटांचा अनुभव आहे सांगताना शरद पवार यांनी पूरस्थितीचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार अंतिम धोरण जाहीर करणार अशी माहिती दिली आहे.

 

“सहा ते सात जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये नुकसान झालं आहे. सातारा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सांगली, कोल्हापूर, रायगड अशा एकूण सात जिल्ह्यांसहित अन्य जिल्ह्यातही नुकसान झालं आहे. त्यांना मदत करण्याची गरज आहे. पूरस्थिती अहवाल आल्यानंतर राज्य सरकार अंतिम धोरण जाहीर करुन जबाबदारी घेईल,” असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!