राष्ट्रवादी पक्ष कार्यलयात वर्धापनदिन जल्लोषात साजरा

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील राष्ट्रवादी पक्षाचा २३ वा वर्धापन दिन सोहळा तालुका पक्ष कार्यलयात उत्साहात पार पडला. यावेळी कार्यालयात सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहन करून केक कापत मोठा जल्लोष करण्यात आला.

 

अमळनेर तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला. आ.अनिल भाईदास पाटील हे बाहेरगावी असल्याने त्यांनी भ्रमणध्वनी वरून सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्यात. तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यावेळी मनोगत व्यक्त करून पक्षाध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांचे पक्षाच्या माध्यमातून असलेले जनहीताचे ध्येयधोरण आणि पक्षाचा वाढता विस्तार यावर प्रकाशझोत टाकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार घराघरात पोहोचवावे असे आवाहन केले. याप्रसंगी अमळनेर बाजार समितीच्या मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील, हिंगोण्याच्या सरपंच राजश्री पाटील, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, कार्याध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, प्रदेश प्रतिनिधी शिवाजीराव पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख भागवत पाटील, कृ. उ. बा. समिती प्रशासक मंडळ सदस्य एल.टी. पाटील, शेतकी संघाचे संजय पुनाजी पाटील, प्रा अशोक पवार, डॉ.सेलचे रामकृष्ण पाटील, विजय सेठ पाटील, पंचायत समितीचे सदस्य प्रविण पाटील, विनोद जाधव, निवृत्ती बागुल, नगरसेवक विवेक पाटील, दीपक पाटील, प्रविण पाटील उर्फ भटू, गणेश भामरे, अनिल बोरसे, संजय आबा पाटील, रफिक मिस्तरी, आबिद मिस्तरी, बाळा साहेब शिसोदे, गिरीष सोनजी पाटील, योजना पाटील, वैशाली ससाणे, आशा चावरीया, युवकचे गौरव पाटील, यतीन पवार, निनाद शिसोदे, सुनिल शिंपी, अनिरुद्ध शिसोदे, सनी गायकवाड, कृष्णा पाटील, नितीन भदाणे, बाळु पाटील आदी सर्व फ्रंटलचे पदाधिकारी कार्यकर्ते, आजी माजी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!