नवयुवकांना दिला राष्ट्रवादीत प्रवेश (व्हिडिओ)

जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात झाला पक्षप्रवेश : वाल्मिक नगरातील युव्कानाचा समावेश

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रभैय्या पाटील यांच्या उपस्थितीत वाल्मिक नगर, तानाजी मालसुरे नगर, दिनकर नगरांतील असंख्य तरूणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

वाल्मिक नगर येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय वासुदेव सोनवणे यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपल्या अनेक समर्थकांसह जाहीर प्रवेश केला. यावेळी वासुदेव सोनवणे यांना जळगाव महानगर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रभैय्या पाटील, प्रदेश चिटणीस एजाज मलिक, महानगराध्यक्ष अशोकभाऊ लाडवंजारी, प्रदेश प्रवक्ते योगेश देसले, सहकार जिल्हाध्यक्ष वाल्मीकमामा पाटील, उपाध्यक्ष भगवान सोनवणे, युवक कार्याध्यक्ष सुशील शिंदे, सरचिटणीस रहीम तडवी, उपाध्यक्ष किरण राजपूत, नईम खाटीक, राहुल टोके, प्रवेश करणाऱ्यांमध्ये जितेंद्र सोनवणे यांना महानगर उपाध्यक्क्षपदी निवड करण्यात आली. मुन्ना उर्फ रतिलाल सोनवणे, बबन सोनवणे, भैया शंखपाळ, सागर कोळी यासोबत असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!