जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | केंद्र सरकारने गॅस केलेल्या दरवाढ विरोधात आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीन शिवतीर्थ मैदान येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी गॅस दरवाढी विरोधात सिलेंडर उलटे ठेवून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आले.
केंद्राने एका गॅस सिलेंडर मागे ५० रुपयांची दरवाढ केली आहे. या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिला महानगराध्यकक्षा मंगला पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री छत्रपती शिवजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी गॅस सिलेंडर उलटे ठेवून मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मंगला पाटील यांनी केंद्राने केलेली गॅस दरवाढ मागे न घेल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी निशा निंबाळकर, प्रेरणा सूर्यवंशी, सुवर्णा सोनवणे, मनीषा देशमुख, पूजा पाटील, शैला पाटील, मीनाक्षी शिजवडे, संगीता तायडे पुष्पा पाटील, कलाबाई शिरसाठ, मनीषा साळी आदी उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/279050661085731