राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा संघटकपदी विनोद कांबळे

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी यांनी सांगवी ता. पाचोरा जि. जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते विनोद सुरेश कांबळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग जळगाव जिल्हा संघटकपदी निवड केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष पंडीत कांबळे यांच्या आदेशानुसार विनोद सुरेश कांबळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग जळगाव जिल्हा संघटकपदी निवड करण्यात आली आहे. विनोद कांबळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव महानगर मा. जिल्हाध्यक्ष परेश कोल्हे, कार्यालय प्रमुख संजय चव्हाण, गणेश निंबाळकर, छोटू सरकार यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले. विनोद कांबळे यांच्या निवडीने त्यांचेवर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content