राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर संघातर्फे शेंदुर्णीत गरूड विद्यालयातील गुणवंतांचा सत्कार

शेअर करा !

शेंदुर्णी, ता जामनेर । जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर सेलच्या वतीने दहावी बारावीच्या येथिल आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालया व आ.र.भा. गरुड कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.

गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्याचे नेते संजय गरूड होते. यावेळी १२वी विज्ञान महाविद्यालयातून प्रथम आलेली कु विद्या संदीप गुजर ८४, द्वितीय रितेश उत्तम वानखेडे ८१.६२, तृतीय गरूड साईराज प्रविण ७८, अंजली धनगर, वैष्णवी जगदीश बैरागी, आदित्य गोकुळ, कला विभाग – महाविद्यालयातुन स्वप्नील युवराज जाधव ७४. ६१, द्वितीय कु. वारूळे स्नेहा गणेश, तृतीय भारती प्रकाश राजपुत, चौथा महेंद्र राठोड, निलीमा राजु चौधरी, दिपाली पंढरी उशीर,वाणिज्य विभागातुन प्रथम सेजल चव्हाण, द्वितीय दिग्विजय रविंद्र पाटील, तृतीय अंजली भास्कर हटकर, चतुर्थ दिपक अशोक बारी, पाचवा लिना शांताराम वाघ. किमान कौशल्य विभाग – नितीन चरणदास नाईक, निलेश राजु राठोड, मोनाली श्रीराम डामरे या गुणवंतांचा गुलाबपुष्प प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणुन विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष विलास राजपुत, युवक रा. कॉ. अध्यक्ष शैलेश पाटील, रां.काँ. पदविधर संघाचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक पाटील, सचिव सागरमल जैन, शांताराम गुजर, रा.काँ. शहराध्यक्ष रविंद्र गुजर, संदीप हिवाळे, मुख्याधापक डि आर शिंपी, उपमुख्याध्यापक आर. एस. चौधरी, पर्यवेक्षक ए. बी. ठोके, आणि आर. एस. चौधरी , विद्यार्थी पालक उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पी. जे. पाटील, आभार उपमुख्याध्यापक आर. एस. चौधरी यांनी मानले. माध्यमिक विद्यालयातुन १oवीत ११ विद्यार्थ्यांनी ९०टक्यां पेक्षा जास्त गुण मिळविले आहे. यामध्ये द्वितीय बारी पायल गणेश ९५.४०, तृतीय शुभम अशोक वानखेडे ९५ टक्के, चतुर्थ तनुजा तुकाराम तायडे ९४.८०, दिप निलेश जैन ९४ .४०, .वैष्णवी अनिल देसाई ९४.२०, महेश संजय चौधरी ९३.८० टक्के, जैन भाविक शैलेश ९३.८०, साईराज शांताराम गुजर ९३.६०, गरूड वैभव देविदास ९३.४०, चैतन्य भास्कर गरुड ९३.४० टक्के गुण मिळवून पहिल्या दहा मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयातुन पीएचडी पुर्ण केलेले शारीरिक शिक्षणातुन प्रा. महेश पाटील, प्रा. दिपक धोबी यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!