राष्ट्रवादीच्या अभिप्राय मोहिमेस जळगावातून उत्तम प्रतिसाद

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसच्या नुकत्याच पार पडलेल्या अभिप्राय मोहिमेत जळगाव शहर विधानसभा क्षेत्रातून उद्दीष्टापेक्षा तब्बल ३००.८५ टक्के इतका प्रतिसाद मिळाला असून हे प्रमाण खान्देशात सर्वाधीक आहे.

store advt

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नुकतेच अभिप्राय मोहिम राबविली. यात राज्यभरातील जनतेकडून डिजीटल माध्यमातून अभिप्राय मागविण्यात आले होते. याला अतिशय उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला असून याच्या अंतर्गत राज्यातून तब्बल ७,३५,००० इतक्या अभिप्रायांची नोंद झाली. यामध्ये जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून उद्दीष्टापेक्षा ३००.८५ टक्के इतके अभिप्राय नोंदविण्यात आला आहेत. हे प्रमाण खान्देशात सर्वाधीक असून राज्यातील आघाडीच्या मतदारसंघांमध्ये जळगाव शहरचा समावेश झाल्याचे अधोरेखीत झाले आहे. पक्षाचे महानराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली अभिप्राय मोहिम राबविण्यात आले असल्याची माहिती त्यांनी पत्रकान्वये कळविले आहे.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!