राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर

शिंपी समाज युवक मंडळातर्फे कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील श्री क्षत्रिय शिंपी समाज हितवर्धक संस्था संचलित शिंपी समाज युवक मंडळातर्फे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने गुरूवार १२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता सिंधी कॉलनीतील शेठ फत्रू लक्ष्मण शिंपी समाज वसतीगृह येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

यावेळी सर्वप्रथम स्वामी विवेकानंदांच्या व राजमाता जिजाऊ आऊसाहेबांच्या प्रतिमेचे पूजन शिंपी समाजाचे युवक शहराअध्यक्ष जितेंद्र शिंपी, युवक कार्याध्यक्ष संदीप सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. तर रक्तदान शिबिराचे उद्घाटन संस्था अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, अमृत महोत्सवाचे स्वागत अध्यक्ष विवेक जगताप यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी १५ जणांनी रक्तदान केले होते.

या भव्य रक्तदान शिबीराच्या प्रसंगी अखिल भारतीय शिंपी समाजाचे माजी युवक अध्यक्ष मनोज भांडारकर, कार्यकारणी सदस्य चेतन खैरनार, शहर युवक संघटक अमित जगताप, युवा कार्याध्यक्ष एडवोकेट भूषण सोनवणे, जिग्नेश सोनवणे, हेमंत शिंपी, विशाल देवरे , सुमित अहिरराव, सागर शिंपी , ऋषिकेश शिंपी, निलेश चव्हाण , निखिल सोनवणे , राकेश बाविस्कर , राजेश सोनवणे, अशोक सोनवणे, कमलेश शिंपी, मुकुंदराव मेटकर, अनिल सोनवणे, सुरेश दादा सोनवणे, दिलीप सोनवणे, गणेश सोनवणे, सोमनाथ बाविस्कर, दत्तात्रय वारुळे, राजेंद्र वारुळे, नथू शिंपी, इत्यादीसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. रक्तदान शिबीरासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. शंकरलाल सोनवणे, सीमा शिंदे, निता पाटील, उमाकांत शिंपी, अन्वर खान यांचे विशेष सहकार्य लाभले,

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content