रावेर येथे १० दिवशीय श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचा समारोप

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा जळगाव शाखा अंतर्गत रावेर शहर शाखा यांच्या वतीने ५ मे ते १४ मे पर्यंत बुद्ध पौर्णिमा चे औचित्य साधून दहा दिवशीय बौध्दाचार्य श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचे बुद्ध नगरी स्टेशन रोड रावेर येथे आयोजन केले होते व शिबिराची सांगता १४ मे रोजी करण्यात आली.

या श्रामणेर प्रशिक्षण शिबिराला सलग दहा दिवस केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे यांनी संघाला प्रशिक्षित केले. या सांगता समारोहाचे अध्यक्ष म्हणून रावेर शहर शाखेचे अध्यक्ष राहुल डी. गाढे हे तर प्रमुख अतिथी म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष शैलेंद्र जाधव, शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक संघरत्न दामोदरे, जिल्हा सरचिटणीस सुमंगल अहिरे,समता सैनिक दलाचे जिल्हा प्रमुख युवराज नरवाडे, भुसावळ तालुका अध्यक्ष प्रविण डांगे, केंद्रीय शिक्षक प्रकाश सरदार, केंद्रीय शिक्षिका लताताई तायडे, वैशालीताई सरदार,प्रियंका ताई अहिरे, माधुरी ताई भालेराव केंद्रीय शिक्षक प्रकाश सरदार हे होते.

श्रामणेर संघाचे उपाध्याय भंते दिपंकर यांनी सर्व उपस्थितांना त्रिशरन पंचशील दिले. या श्रामणेर प्रशिक्षण शिबिरात ३४ शिबिरार्थींनी सहभाग घेतला होता त्यांना यावेळी शिबिराचे प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक संघरत्न दामोदरे जिल्हा अध्यक्ष शैलेंद्र जाधव, जिल्हा सरचिटणीस सुमंगल अहिरे, समता सैनिक दलाचे जिल्हा प्रमुख युवराज नरवाडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भव्य भोजन दानाचे आयोजन केले होते.

रावेर येथील बुध्दनगरी येथे दहा दिवशीय श्रामणेर प्रशिक्षण शिबिराला रावेर शहर शाखा कोषाध्यक्ष यशवंतराव कोंघे,रावेर शहर शाखा सरचिटणीस विशाल तायडे,रावेर शहर शाखा सरचिटणीस धनराज घेटेतसेच धम्मसेवक म्हणून गौतम अटकाळे,महेंद्र तायडे,रितेश निकम,नितीन अधांगळे,योगेश तायडे,रत्नाकर बनसोडे,विशाल भालेराव, दिपक अट काळे,मोहन लहासे, योगेश नन्नवरे, राजेन्द्र अटकाळे विजय भोसले, सदाशिव निकम,निलेश नन्नवरे, सदाशिव गजरे, बंटी ताकटे,यांच्यासह असंख्य बौध्द उपासक, उपसिका यांनी सहकार्य केले. यावेळी समारोप प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, समता सैनिक दलाचे पदाधिकारी तसेच बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरणत्तय गाथा घेऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा संघटक केंद्रीय शिक्षक विजय अवसरमल यांनी केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content