रावेर येथे गोडावून उपलब्ध झाल्याने मका खरेदीचा मार्ग मोकळा – तहसीलदार देवगुणे

शेअर करा !

रावेर प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून मका खरेदी करण्यासाठी गोडावून उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत होते. मात्र तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी गोडावून उपलब्ध करून दिल्याने आज पासून मका खरेदीस सुरूवात होत आहे.

store advt

रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांचा अद्याप मका खरेदी करण्याचे काम बंद पडले होते. गोडावून नसल्याने प्रशासनाची मोठी गैरसोय होत होती. मात्र रविवारी सूटीच्या दिवशी तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी भोकरी रोड महेंद्र पाटलांचे गोडाऊन खरेदी केंद्रासाठी उपलब्ध करून देण्यात आले. शासनाकडून मक्याला १ हजार ७६० भाव निश्चित करण्यात आला असून तालुक्यातील सुमारे १२०० शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी नंबर लावला आहे. गोडाऊन अभावी अनेक दिवसांपासून मका खरेदी केंद्र रखडली होती आता सुरळीत झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!