रावेर बाजार समिती सभापतीपदी सचिन पाटील तर योगेश पाटील उपसभापती

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सचिन रमेश पाटील तर उपसभापतीपदी योगेश पाटील यांची आज बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे.

 

अलीकडेच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलने दणदणीत यश संपादन केले होते. यानंतर सभापती आणि उपसभापती पदांसाठी मोठी चुरस निर्माण झाली होती. या दोन्ही पदांसाठी अनुक्रमे मंदार पाटील या राजेंद्र चौधरी यांच्यापैकी नियुक्ती होईल असे मानले जात होते. तथापि, आज झालेल्या निवडणुकीत धक्कातंत्राचा वापर करत महाविकास आघाडीच्या पॅनलने सभापतीपदासाठी सचिन रमेश पाटील व उपसभापती पदासाठी योगेश पाटील यांनी उमेदवारी  जाहीर करण्यात आली.

 

दरम्यान, आज छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी विजयसिंह गवळी ,सहा.निवडणूक अधिकारी आय.बी.तडवी, फकीरा तडवी यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. याप्रसंगी सभापती पदासाठी सचिन पाटील व उपसभापती पदासाठी योगेश पाटील यांचे प्रत्येकी एक अर्ज सादर झाल्याने या दोन्ही पदांवर बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. याप्रसंगी आमदार शिरीष चौधरी यांच्यासह बाजार समितीचे संचालक उपस्थित होते. निवड जाहीर होताच मोठा जल्लोष करण्यात आला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content