रावेर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी राजेंद्र महाजन यांची निवड बिनविरोध

शेअर करा !

रावेर प्रतिनिधी । येथील नगरपालिकेचे उपनगराध्यक्षाच्या रिक्त पदावर राजेंद्र महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पिठासन अधिकारी तथा तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली.

store advt

रावेर येथील शे.सादीक अब्दुल नबी यांनी काही कारणास्तव उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदाची पिठासन अधिकारी तथा तहसीलदार अभिलाषा देवगण यांच्या अध्यक्षतेखाली व नगराध्यक्ष दारा मोहम्मद जफर मो. यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड प्रक्रीया पार पडली असून उपनगराध्यक्ष पदासाठी एकमेव राजेंद्र महाजन यांचा अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूक कामकाजासाठी मुख्याधिकारी रविंद्र लांडे, निरीक्षक धोंडू वाणी यांनी सहकार्य कले. तर नगरसेवक प्रल्हाद महाजन, शारदाबाई चौधरी, पार्वताबाई शिंदे, अॅड.सरज चौधरी, संगीता महाजन, यशवंत दलाल, संगीता वाणी, हमीदाबी अय्यूब पठाण, ललीता बर्वे, आसिफ मोहम्म्द, शे नमरत यासमिन, रंजना गूजर, सधीर पाटील, संगीता अग्रवाल, प्रकाश अगग्रवाल आदी सर्व नगरसेवक उपस्थित होते. नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष राजेंद्र महाजन यांना शुभेच्छा देण्यासाठी ॲड. योगेश गुजर, पोलीस पाटील लक्ष्मीकांत मोहोर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!