रावेर तालुक्यात वादळामुळे ७ कोटीचे पिकांचे नुकसान

 

 

रावेर : प्रतिनिधी ।  मागील आठवड्यात झालेल्या वादळी पावसामुळे तालुक्यात सुमारे सात कोटी रूपयांचे ४६८ शेतक-यांचे नुकसान  झाल्याचे अंतिम अहवाल तालुका प्रशासनाला  प्राप्त झाला आहे.

 

रावेर तालुक्यात मागील आठवड्यात  २० व  २१ मार्च रोजी झालेल्या वादळी पावसाचा अंतिम अहवाल प्राप्त झाला आहे.पंचनामे करण्यात ढिलाई  करण्या-या महसूलला भाजपा कडून निवेदन  देण्यात आले होते आज अखेर अंतिम पंचनाम्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये ३१ गावांमधील ४६८ शेतक-यांचे ३०३ बाधीत क्षेत्रावरील ६ कोटी ९७ लाख ४३ हजार रुपये नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे.यामध्ये २०५ शेतक-यांचे १४५ मक्याचे क्षेत्र नुकसानीमुळे बाधीत आहे. गहू ३ शेतक-यांचे २.५ क्षेत्र नुकसानीमुळे बाधीत आहे.केळीचे २६० शेतक-यांचे १५५ क्षेत्र नुकसानीमुळे बाधीत आहे

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.