रावेर तालुक्यात आज पाच रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळले

रावेर प्रतिनिधी । रावेर कोवीड रूग्णालयाने संशयित रूग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी पाच रूग्ण कोरोना असल्याचे रूग्ण आढळले. या वृत्ताला तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी दुजोरा दिला आहे.

store advt

जिल्ह्यासह रावेर तालुक्यात कोरोनाचे रूग्ण वाढत आहे. संशयित रूग्णांचे स्वॅब घेवून रावेर कोवीड सेंटरने तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी पाच रूग्ण कोरोना बाधित आढळून आल्याचे निष्पन्न झाले आहे. आज आढळून आलेल्या कोरोना रूग्ण हे तालुक्यातील आहिरवाडी येथील २ तर रावेर शहरातील ३ असे एकुण पाच रूग्ण आढळून आले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा पुन्हा चिंतेत पडली आहे. या वृत्ताला तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी दुजोरा दिला आहे.

error: Content is protected !!