रावेर तालुक्यातील कोतवालांचे आरक्षण जाहीर

रावेर- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील आठ गावांसाठी कोतवाल आरक्षण  तहसील कार्यालयात प्रांतधिकारी यांच्या प्रमुख उपस्थित निश्चित करण्यात आले आहे.

 

रावेर तालुक्यात आठ ठिकाणी कोतवाल पद रिक्त आहेत. या संदर्भात आज तहसीलदार कार्यालयात प्रांतधिकारी कैलास कडलक यांच्या प्रमुख उपस्थित आरक्षण सोडत काढण्यात आले यामध्ये सावखेडा अनुसुचित जमाती  केर्‍हाळा बु विजाअ बलवाडी, खुला वाघोदा बु आर्थिकदृष्टया दुर्बल घटक; खानापुर इतर मागास प्रवर्ग अजंदे भजड कांडवेल इतर मागास वर्ग कोचुर बु खुला महिलेसाठी राखीव असणार आहे.लवकरच या आठ रिक्त पदावर भरती प्रक्रिया सुरु होणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content