रावेरात विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या

रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील २१ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दुपारी घडली. याबाबत रावेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर माहिती अशी की, पश्चिम बंगाल मधील बनाथाली गुरु होगली येथील मुळ रहीवासी असलेले शितल मलिक हे आपल्या पत्नी मौसमी मलिक (वय-२१) यांच्यासह वास्तव्याला आहे. पती पत्नी हे सोन्याचे दागिने बनविण्याचे काम करतात. शहरातील चौराहा येथील भाड्याच्या घरात रहायला आहे. दरम्यान सोमवार ९  मे रोजी दुपारी राहत्या घरात ओढणीच्या मदतीने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. याबाबत अतुल सुरेश सपकाळे यांनी दिलेल्या खबरीवरून रावेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुरेश मेढे करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!