रावेरात नवीन पाच कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळले

शेअर करा !

रावेर प्रतिनिधी । रावेर कोवीड सेंटरने पाठविलेल्या संशयित रूग्णांचे स्वॅब तपासणी अहवाल प्राप्त झाला असून त्यात तालुक्यातील पाच रूग्ण पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले आह. अशी माहिती तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी दिली.

store advt

रावेर तालुक्यात आत्तापर्यंत २२८ रूग्ण कोरोनाबाधितांची संख्या झाली आहे. त्यामुळे तालुक्यासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने दररोज कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत आहे. आज नव्याने पाच रूग्ण तालुक्यात आढळून आले आहे. अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. आढळून आलेल्या रूग्णांमध्ये तालुक्यातील वाघोड १, केऱ्हाळे १, चिनावल १, विवरे १ आणि रसलपूर येथील एक असे एकुण पाच रूग्ण आढळले आहे. आता २३४ रूग्ण कोरोनाबाधित आहे. या वृत्ताला तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी दुजोरा दिला आहे. आरोग्य विभागाचा पुन्हा ताण वाढला आहे. नागरिकांनी घाबरून न जाता घरीच बसा काळजी घ्या असे आवाहन आरोग्य प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!