रावेरात दिग्गजांचे भवितव्य सिलबंद; ९५.६२ टक्के झाले मतदान

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  रावेर कृषी उपन्न बाजार समितीला ९५.६२ टक्के मतदान झाल.अनेक दिग्गज उमेदवारांचे भवितव्य मतदान पेट्यांमध्ये सिलबंद झाले आहे. तिन पॅनल मध्ये झालेल्या निवडणुकीत मध्ये महाविकास तर्फे आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार अरुण पाटील तर भाजपातर्फे खासदार रक्षा खडसेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. २ हजार ६५२ मतदारांपैकी दोन हजार ५३६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

 

रावेर कृषी उपन्न बाजार समिती महाविकास आघाडी पुरुस्कृत शेतकरी विकास पॅनल भाजपा-सेना पुरुस्कृत लोकमान्य शेतकरी पॅनल जनशक्ती प्रहार पुरस्कृत परीर्वतन  शेतकरी पॅनल तिन पॅनलसह अपक्षांमध्ये १८ जागांसाठी ५१ उमेदवारांमध्ये लढत होती.येथील यशवंत विद्यालयात सात बूथ वर मतदान घेण्यात आले.यासाठी व्यापारी २ सोसायटी २ ग्राम पंचायत २ हमाल मापाडी १ असे एकूण सात मतदान केंद्रावर मतदान पार पडले. २ हजार ६५२ मतदारां पैकी २ हजार ५३६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला सोसायटी मतदार संघात ७४६ पैकी ७२७  मतदान झाले ९७.४५ टक्के त्यानंतर व्यापारी मतदार संघात  एकूण ७६३ पैकी ७०५  मतदान झाले ९२.३९ टक्के तसेच हमाल मापाडी २३४ पैकी २२६ मतदान झाले ९६.५८ तर ग्राम पंचायत मतदार संघात ९०९ पैकी ८७८ मतदान झाले  ९६.५८ टक्के उद्या सकाळी आठ वाजे पासुन सात टेबलवर मतमोजणी सुरुवात होणार आहे.रावेर शहरतील स्वामी विवेकानंद शाळेत एकूण १४ कर्मचारी सात टेबलांवर मतमोजणी करणार आहे.

Protected Content