रावेरच्या तहसीलदार उषाराणी देवगुणे यांचा ‘उत्कृष्ट तहसीलदार’ सन्मानपत्राने गौरव

शेअर करा !

यावल प्रतिनिधी । आपल्या कार्यक्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनिय कामगिरी बजावणाऱ्या रावेरच्या तहसीलदार उषाराणी देवगुणे यांचा सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला. आज महसुल दिनानिमित्त तहसील कार्यालयात कार्यक्रम घेण्यात आला.

store advt

यावल तहसील कार्यालयातील आवारातील आज दिनांक १ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता संपन्न झालेल्या उत्कृष्ट कामगीरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांना सन्मानपत्र देवुन गौरवविण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन होते तर प्रमुख पाहुणे ग्हणुन रावेरचे आमदार शिरीषदादा चौधरी, विभागाचे प्रांत अधिकारी डॉ अजीत थोरबोले, सौ. सुप्रिया थोरबोले, यावलचे तहसीलदार जितेन्द्र कुवर, निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार आदी उपस्थितीत पार पडलेल्या या पुरस्कार वितरण कार्यक्रमात रावेरच्या कार्यतत्पर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना उत्कृष्ठ तहसीलदार सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व पाहण्यांचा परिचय जे. डी. बंगाळे यांनी केले

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!