रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची एमएसईबी सबस्टेशनला भेट

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जी.एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या विद्युत अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी जळगाव शहारालगत असलेल्या पाळधी येथील एमएसईसीबीच्या २२० केव्ही या सबस्टेशनला भेट दिली.

 

या भेटीचा मुख्य उद्देश हा विद्युत क्षेत्रातील नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा कल समजुन घेणे व त्याला आत्मसात करणे हा होता. या क्षेत्रभेटी अंतर्गत विद्यार्थ्यांनी एमईसीबी विभागाचे प्रत्यक्षात प्रात्यक्षिके पाहिली. तसेच ट्रान्सफार्मरचे वायडिंग, हायवोल्टेज ट्रान्समिशन, नवीन पीएलसी आणि स्काडा युज करून ट्रान्समिशन कसे चालते, प्रोटेक्शन स्कीम, रिले, आयसोलेटर, सर्किट ब्रेकर आदीचे प्रात्यक्षिक बघत विद्यार्थ्यांनी सबस्टेशनवरील विविध पैलू आत्मसात केले. जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाने या दौऱ्याचे नियोजन केले होते त्यांनी यावेळी नमूद कि, विध्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच औद्योगिक कार्यप्रणाली कशी चालते याचा परिचय झाला पाहिजे तसेच या अभ्यास दौऱ्यातील काही मुद्धे विध्यार्थ्याना विद्युत विषयात उपयोगी पडतील व त्यांचा सर्वांगीण विकास होईल तसेच या अभ्यास दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना विद्युत या तंत्रज्ञान क्षेत्रात नौकरी मिळविण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबींबद्दल ज्ञान मिळाले व पाळधी येथील एमएसईसीबीच्या २२० केव्ही या सबस्टेशनसारख्या विभागाला प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची कार्यपद्धती आणि कामकाज जाणून घेण्याची संधी मिळाली याचा आनंद वाटतो. यानंतर या अभ्यास दौऱ्यातील सहभागी विद्यार्थ्यांनी त्यांचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला असुन भविष्यात होणाऱ्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये याचा नक्कीच फायदा होईल अश्या प्रतिक्रीया दिल्या. सदर अभ्यास दौऱ्याच्या यशस्वी आयोजना करीता विद्युत विभाग प्रमुख प्रा. डॉ. बिपासा पात्रा यांचे मार्गदर्शन लाभले तसेच प्रा. प्रियंका गाजरे व प्रा. मनीष महाले यांनी विशेष परीश्रम घेतले. या अभ्यास दौऱ्याचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी कौतुक केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content