रायपुर येथील गायरानवरील अतिक्रमण काढले

सावदा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | रायपूर ता. रावेर येथील  गायरान अतिक्रमण आज शुक्रवार दि. २५ नोव्हेंबर रोजी  महसूलच्या पथकाद्वारे काढण्यात आले.

 

रायपुर येथील गट नं 465,417 व 33 वरील शेतीसाठी असलेले अतिक्रमण जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या जाहीर प्रगटनानुसार एकूण क्षेत्र हे.11.42आर वरील अतिक्रमण जेसीबी  व ट्रॅक्टरच्या साह्याने आज शुक्रवार दि. २५ नोव्हेंबर रोजी  काढण्यात आले. याप्रसंगी रावेर तहसीलदार  गटविकास अधिकारी, परीविक्षाधीन तहसीलदार, नायब तहसीलदार, API सावदा, PSI सावदा, पोलीस, मंडळ अधिकारी सावदा, मंडळ अधिकारी रावेर, मंडळ अधिकारी  खिरोदा प्र यावल , मंडळ अधिकारी खिर्डी,अव्वल कारकून, तलाठी रायपूर, तलाठी सावदा, तलाठी मस्कावद, तलाठी उदळी, तलाठी गाते, ग्रामसेवक रायपूर, प्रशासक ग्राम पंचायत रायपूर, महसूल सहाय्यक, शिपाई, कोतवाल यावेळी उपस्थित होते. सावदा तलाठी एस. के. पाटील, रायपूर तलाठी श्रीहरी कांबळे, ओ. एस. मटाले. तलाठी मस्कावद  प्रोपेश चोपडे तलाठी गाते, यासिन तडवी म. अ. रावेर सुरेश बोरनारे उपस्थित होते.

Protected Content