रामेश्वर कॉलनीतून २४ वर्षीय तरूण बेपत्ता

एमआयडीसी पोलीसात हरविल्याची नोंद

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गावात जावून येतो असे सांगून गेलेला रामेश्वर कॉलनीतील अपंग असलेला तरूण हा बेपत्ता झाला आहे. याबाबत रविवारी १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राजेश जितेंद्र मोर्या (वय-२४) रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव, हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. दरम्यान, राजेश मोर्या हा ९० टक्के अपंग आहे. १५ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता मी गावात जावून येतो असे सांगून राजेश हा घरातून गेला. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत तो न असल्याने त्याचा सर्वत्र शोध घेतला परंतू त्याचा कुठेही शोध लागला नाही. अखेर रविवारी १८ सप्टेंबर रोजी त्याचे वडील जितेंद्र वैजनाथ मौर्या यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ संजय धनगर करीत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content