राममंदिरासाठी अद्याप शिवसेनेनेकडून एक रुपयाही आला नाही : महंत नृत्य गोपाल दास

अयोध्या (वृत्तसंस्था) शिवसेनेने राममंदिरासाठी एक कोटी दान देण्याची घोषणा केली होती. मात्र अजून यातील एक रुपयाही आला नसल्याचे राममंदिर निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले आहे.

एबीपी माझाशी बोलताना ते बोलत होते. शिवसेनेने एक कोटी दान देण्याची घोषणा केली होती,याबाबत विचारले असता, त्यावर महंत नृत्य गोपाल दास म्हणाले अजून काही माहिती नाही. आतापर्यंत एक रुपयाही आलेला नाही. मुरारी बापू देखील दान देणार होते पण अजून पैसे आले नाहीत. मात्र मंदिर निर्माणासाठी पैशांची कमी पडणार नाही. राममंदिर भूमिपूजनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सारे साधुसंत तयारीत आहेत. आता एका महिन्याच्या आत मंदिर निर्माणाचे काम सुरू होईल,असेही त्यांनी सांगितले. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मंदिर निर्मितीसाठी जो ट्रस्ट स्थापन झाला आहे त्याचे महंत नृत्य गोपाल दास अध्यक्ष आहेत.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.