रामदास आठवले यांचाही कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह

शेअर करा !

मुंबईः वृत्तसंस्था ।अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचाही कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

रामदास आठवले यांनी काल चाचणी करून घेतली होती. सौम्य लक्षणं जाणवत असून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आठवले यांच्या संपर्कात आलेल्या इतर कार्यकर्त्यांनीही चाचणी करुन घ्यावी, असं आवाहन रामदास आठवले यांनी केलं आहे.

रामदास आठवले यांनी अभिनेत्री पायल घोषला रिपाइं पक्षात प्रवेश दिला होता. त्यावेळी रामदास आठवले उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान अनेक कार्यकर्ते व पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित होती.

आठवलेंनी हाथरस प्रकरणी पिडीतेच्या कुटुंबीयांची भेटही घेतली होती. राज्यात अतिवृष्टीग्रस्त भागांत जाऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणीही केली होती. त्यामुळं आठवले यांना नेमका कसा संसर्ग झाला याबाबत अद्याप काही माहिती देण्यात आली नाहीये.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!