राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ५४ रुपये लिटर पेट्रोल (व्हिडिओ)

जळगाव-लाईह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५४ वा वाढदिवसानिमित्त सागर पार्क येथील पेट्रोल पंपावर मनसेकडून ५४ रुपये प्रती लिटर पेट्रोल विक्री करण्यात आली.

 

राज्यात पेट्रोलचे दर सतत वाढत असतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवशी आज दि. १४ जून रोजी सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून चक्क ५४ रुपयात एक लिटर दराने पेट्रोलची विक्री करण्यात आली. ५४ रुपये लिटरप्रमाणे पेट्रोल मिळत असल्याने पेट्रोल पंपावर वाहनचालकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, पेट्रोल पंपावर आलेल्या काही नागरिकांनी मनसे पदाधिकाऱ्यांसोबत हुज्जत घातल्याने काही काळ तणावाचे वातारणात निर्माण झाले होते. यानंतर ५४ रुपये दराने पेट्रोल विक्रीचा उपक्रम थांविण्यात आला. यावर पेट्रोल पंपावर आलेल्या नागरिकांनी अचानक उपक्रम थांबवण्यात आल्याने नाराजी व्यक्त करत हा उपक्रम सुरूच ठेवण्यात यावा अशी अपेक्षा देखील यावेळी व्यक्त केली.  याप्रसंगी जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, शहराध्यक्ष विनोद शिंदे, किरण तळेले, उपशहाराध्यक्ष आशिष सपकाळे, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष योगेश पाटील, विभाग प्रमुख साजन पाटील आदीं उपस्थित होते.

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!