पारोळा, प्रतिनिधी । नागपूर येथून पारोळा, धुळे मार्गे मुंबईला जात असतांना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास माजी पालकमंत्री डॉ. सतिष पाटील यांच्या निवास्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी राज्य शासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन केले.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माजी पालकमंत्री डॉ. सतिष पाटील यांच्या निवास्थानी पत्रकारांशी संवाद साधला. देशमुख यांनी सांगितले की, खान्देशात तसेच महाराष्ट्रात डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, नगरपालिका, महानगरपालिका ही शासकीय यंत्रणा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवस-रात्र काम करीत आहे. खानदेशातून जातांना अनेक ठिकाणी बैठकी घेतल्या. नागरिकांनी राज्य शासनाने दिलेल्या कोरोना संदर्भातील सूचनांचे १०० टक्के पालन केले तर १०० टक्के जिंकू असा विश्वास अनिल देशमुख यांनी व्यक्त केला.