राज्य उत्पादन शुक्ल विभागाचे निरीक्षक दहिवडे निलंबित

जळगाव प्रतिनिधी । कागदपत्रांची तपासणी करत असतांना परमीट रूममध्ये दारू पिणाऱ्या राज्य उत्पादन शुक्ल विभागाचे निरीक्षकांची तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईबाबत अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दुजोरा दिला आहे.

store advt

राज्य उत्पादन शुल्क विभागाचा निरीक्षक नरेंद्र दहिवडे हे परमीट रुम व बियरबारची तपासणी करण्यासाठी गेले असता तेथे दप्तरावर नोंदी घेत असतानाच बियर पित होते. याबाबतचा व्हीडीओ दोन दिवसापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याची गंभीर दखल वरिष्ठ अधिकाºयांनी घेतली. नाशिक विभागीय उपायुक्त ए.एन.ओहोळ सोमवारी जळगावात आले होते. त्यांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली. जिल्ह्याचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी अहवाल तयार करुन तो उपायुक्तांकडे सादर केला. त्यांनी राज्याचे आयुक्त कांतीलाल उमाप यांच्याकडे हा अहवाल पाठविला. त्यावर सोमवारी रात्री निलंबनाची कारवाई होऊन तसे आदेश प्राप्त झाले. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय जळगाव शहर देण्यात आले आहे. नरेंद्र दहिवडे यांचा ऑन ड्युटी मद्यप्राशन करतानाचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हीडीओ हा २०१८ या वर्षाचा असून तो शहरातील महामार्गावरील शिवकॉलनीजवळील एका हॉटेलमधला असल्याचे चौकशी निष्पन्न झाल्याची माहिती अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिली.

error: Content is protected !!