राज्यात रिक्षांची वयोमर्यांदा १५ वर्षे

मुंबई परिसरात १ ऑगस्ट २०२१ पासून अंमलबजावणी

मुंबई :वृत्तसंस्था । परिवहन विभागानं राज्यात रिक्षांची वयोमर्यांदा १५ वर्षे करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ही वयोमर्यादा २० वर्षे होती. मुंबई वगळून इतर भागांमध्ये ती टॅक्सींप्रमाणे करण्यात आली आहे नव्या निर्णयानुसार १ ऑगस्ट २०२१ पासून मुंबई परिसरात १५ वर्षांपेक्षा जुन्या रिक्षा चालवण्यास बंदी असेल.

उर्वरित महाराष्ट्रात १ ऑगस्ट २०२४ पासून हा निर्णय लागू होणार आहे. २०१३ पूर्वी राज्यात टॅक्सींसाठी वयोमर्यादेचं बंधन घालण्यात आलं असलं तरी रिक्षांसाठी मात्र बंधन नव्हतं.

माजी आयएएस अधिकारी बी.सी. खटुआ यांच्या समितीच्या शिफारसींच्या आधारावर परिवहन प्राधिकरणानं हा निर्णय घेतला. २०१७ मध्ये खटुआ समितीनं महाराष्ट्र सरकारला अहवाल सोपवला होता. राज्यात सध्या १० लाखांपेक्षा अधिक रिक्षा रस्त्यांवर आहेत. यापूर्वी हकीम समितीनं केलेल्या शिफारसींच्या आधारावर १ ऑगस्ट २०१३ पासून प्राधिकरणानं रिक्षा आणि टॅक्सींची वयोमर्यादा कमी करण्याचा निर्णय घेतला होता.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.