राज्यात पुन्हा ९६ पोलिस कोरोनाबाधित, एकुण आकडा ७१४ वर

शेअर करा !

मुंबई वृत्तसंस्था । राज्यात कोरोनाबाधित पुन्हा ९६ पोलिसांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे अवघ्या चार दिवसात २५७ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. राज्यभरातील बाधित पोलिसांचा आकडा ७१४ वर पोहोचला आहे. यामध्ये ८१ अधिकाऱ्यांना आणि ६३३ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

कोरोनाची लक्षणे असलेल्या पोलिसांची संख्या मोठी आहे. ७१ अधिकारी आणि ५७७ अशा एकूण ६४८ पोलिसांना कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत. दुसरीकडे १० अधिकारी आणि ५१ पोलीस कर्मचारी असे एकूण ६१ जण बरे होऊन घरी परतले आहेत. दुर्दैवाने आतापर्यंत ५ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. संचारबंदीच्या काळात पोलिसांवर हल्ल्याच्या घटनेत वाढ होत आहे. आतापर्यंत १९४ ठिकाणी पोलिसांवर हल्ले झाले. याप्रकरणात ६८९ हल्लेखोर नागरिकांना अटक झाली आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!