राज्यातील महाविकासआघाडी सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका : राम शिंदे

शेअर करा !

अहमदनगर (वृत्तसंस्था) राज्यातील महाविकास आघाडी सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका असून आणि त्यामधून अडचणीत आलेला संसार आहे, अशी बोचरी टीका माजी मंत्री आणि भाजप नेते राम शिंदे यांनी केली. ते आज  सोलापूर-नगर महामार्गावर दूध दरवाढीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनावेळी बोलत होते.

store advt

 

यावेळी राम कदम पुढे म्हणाले की, राज्य सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका आणि त्यामधून अडचणीत आलेला हा संसार आहे. घरातला कर्ता माणूस कोपर्‍यात बसला आहे, प्रजा आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. आमच्या सरकारमध्ये आम्ही शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देण्याचे ठरवले होते. मात्र या सरकारने अनुदान दिले नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनता अडचणीत आली आहे. त्यामुळे सरकारचे कान उघडण्यासाठी आज हे आंदोलन करत आहोत, असेही राम शिंदे म्हणाले.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!