राज्यातील आजारी आरोग्य व्यवस्था सुधारण्याचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

 

 

जळगाव – : प्रतिनिधी । शहरातील मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेल्फेयर या सामाजिक संघटनेतर्फे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारण्याबद्दल गुरुवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले आहे.

मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेल्फेयर संघटनेतर्फे आरोग्याच्या प्रश्‍नावर राज्यव्यापी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमे दरम्यान पीएचसी पासून जिल्हा रूग्णालयापर्यंत सर्वेक्षण केले. या सर्वेृक्षणात राज्यातील सरकारी आरोग्य व्यवस्थेतील अनेक त्रुटी समोर आल्या आहेत.

लोेकसंख्येच्या प्रमाणात राज्यात आरोग्य सेवा संस्था नाहीत. याशिवाय आयपीएचएसच्या निकषांनुसार मिळणार्‍या सुविधांचा अभाव आहे. डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफची पदे हजारोंच्या संख्येने रिक्त आहेत. महाराष्ट्रातील खासगी रूग्णालयांनी कोविड-19च्या उपचारासाठी मनमानी पैसे उकळले असल्याचे मोहिमे मधून उघडकीस आहे.

आरोग्यावर होणारा सरकारी खर्च वाढवावा आणि क्लिनिकल आस्थापना (नोेंदणी व नियमन) कायदा लागू करावा, असे आवाहन या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. निवेदनदेतेवेळी संघटनेचे मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेल्फेयर संघटनेचे राज्य सचिव मेहमुद खान, जिल्हाध्यक्ष मोहम्मद आरिफ देशमुख, शहराध्यक्ष अनवर शेख, वसीम अख्तर, इनामूलहक पटेल, इमरान खान, अजहर खान व शेख नईम हे उपस्थित होते.

Protected Content