राज्यपाल विरोधात पाचोरा काँग्रेस आक्रमक

 

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | राज्यपाल नव्हे हे तर भाज्यपाल असुन छत्रपतींसह महाराष्ट्रातील थोर पुरुषांवर नेहमी गरळ ओकणारे कोश्यारी यांचा बंदोबस्त करा, अशी मागणी कॉंग्रेस ने निवेदनातुन उपजिल्हाधिकारी यांच्या कडे केली आहे.

पाचोरा कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पदाधिकारी यांनी येथील उप विभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांना निवेदन देवुन राज्यपाल भरतसिंग कोश्यारी यांनी वारंवार आपल्या संविधानिक पदाचा दुरुपयोग करून महाराष्ट्रातील थोर पुरुषांचा अपमान केला असून यावर मोदी आणि भाजपा गप्प का आहे ? असा सवाल करत थोर पुरुषांची बदनामी ची भाज्यपाल यांना सुपारी दिली आहे का ? असा सवाल कॉंग्रेस ने केला आहे. या निवेदनात पुढे म्हटले आहे की, राज्यपाल यांच्या वक्तव्यावर निषेध नोंदवून या पुढे जर महाराष्ट्र पेटेल तर याला फक्त भाजपा जबाबदार राहील चलो चले छत्रपती के साथ म्हणणार्‍यांना मतांपुरता छत्रपतींचा पुळका येतो का असा सवाल करण्यात आला आहे.

यावेळी कॉंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी शेख इस्माईल शेख फकीरा, सरचिटणीस प्रताप पाटील, शिवराम पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष अॅड. अंबादास गिरी, ओ.बी.सी. तालुका अध्यक्ष इरफान मनियार, शहर अध्यक्ष शरीफ शेख, शहर उपाध्यक्ष अमजद खान, सुनील पाटील, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, आंनद गोसावी, युवक अध्यक्ष संदीप पाटील, शंकर सोनवणे, बंटी भोई, आंनद सोनवणे, जमीर शाह आमिर शाह, अतुल चौधरी, इरफान पठाण, रवींद्र सुरवाडे आदी सह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी राज्यपाल कोशारी विरोधात घोषणा दणाणले. उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी आपल्या भावना शासनाला पोहचविण्यात येतील असे आश्वासन दिले.

Protected Content