राज्यपाल कोश्यारी यांचे वक्तव्य पुन्हा वादाच्या भोवर्‍यात

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | काही दिवसांपूर्वीच मराठी समाजाबाबत वक्तव्य करून गोत्यात सापडल्याने माफी मागावी लागलेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी राजस्थानी व गुजराती समुदाय निघून गेला तर मुंबईत काहीच आर्थिक सुबत्ता उरणार नसल्याचे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली होती. यावरून सर्वत्र टिकेची झोड उठल्यानंतर कोश्यारी यांना अखेर माफी मागावी लागली होती. यानंतर ते पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत.

भगतसिंग कोश्यारी म्हणाले की, विदेशात आता भारतीयांचा सन्मान वाढला आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे शक्य झालं असल्याचंही त्यांनी अप्रत्यक्षपणे म्हटलंय. ‘मोदी वीस वीस तास काम करतात. आपल्याला असं नेतृत्त्व मिळालं आहे, की दुनियेतील लोकं भारतीयांचा सन्मान करताय. मोदींनी स्वाभिमान जागवल्यामुळे परदेशात भारतीयांचा गौरव होतो, त्यांच्या पाठीवर कौतुकात थाप पडते’, असं वक्तव्य भगतसिंग कोश्यारी यांनी केलं आहे. यावरून आता राज्यपालांवर पुन्हा एकदा टिका होऊ लागली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.