राज्यपालांचे धोतर फाडणार्‍यास लाखाचे बक्षीस !

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आक्रमक भूमीका घेत त्यांचे धोतर फाडणार्‍याला एक लाखांचे पारितोषीक जाहीर केले आहे.

याबाबतचे वृत्त असे की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी तुलना केली आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यपालांच्या या विधानावर सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत असून विरोधकांनी याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे.

दरम्यान, पुणे येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संदिप काळे यांनी शहरातील अनेक भागात फलक लावले आहेत. या फलकांवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यावर उतरत्या वयात धोत्रात घाण करण्यासारखे विषारी वक्तव्य करणार्‍या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निषेध असा मजकूर छापण्यात आला आहे. तर ‘राज्यपाल भगतसिंग कोश्यारीचे धोतर फाडणार्‍या व फेडणार्‍यास रूपये एक लाख रूपये रोख रक्कम देण्यात येईल !’ असे देखील यावर नमूद करण्यात आले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content

%d bloggers like this: